कठोर निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नका, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावले

- दिल्लीला ऑक्सिजनचा पुरवठा

Supreme Court - PM Modi - Maharastra Today
Supreme Court - PM Modi - Maharastra Today

दिल्ली :- पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा (Oxygen supply) करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने करोना रुग्णांचे हाल होत आहेत.

केंद्राकडून दिल्ली सरकारला नुकताच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. दिल्ली सरकारने आम्हाला रोज इतकाच ऑक्सिजन पुरवठा केला जावा अशी मागणी केली असताना केंद्राने याबाबत असमर्थता दर्शवली आहे. यावरुन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्राला – आम्हाला कठोर निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नका, असे बजावले.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले की, रोज दिल्लीच्या रुग्णालयांना ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन द्या. पुढील आदेशापर्यंत हा पुरवठा असाच कायम ठेवा.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, मध्यरात्रीपर्यंत ५२७ मेट्रिक टन आणि सकाळी ९ वाजेपर्यंत ८९ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला आहे.

प्रत्येक राज्याला ऑक्सिजनची किती गरज आहे हे जाणून घेण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button