कोरोना प्रादुर्भाव : मांढरदेव यात्रा रद्द

Mandhar Devi Yatra

सातारा : मांढरदेव (Mandhardev Yatra) येथील काळुबाई ही महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. २७, २८ व २९ रोजी देवीची मुख्य यात्रा आहे. मांढरदेव येथील यात्रा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रद्द करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यातील २७, २८ व २९ रोजी पौष पौर्णिमेला देवीची मुख्य यात्रा आहे. दरम्यान १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत असे तब्बल महिनाभर मंदिरच दर्शनासाठी बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेश व निर्देशांनुसार मांढरदेव येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे . त्यामुळे यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा रूढी परंपरेनुसार स्थानिक पातळीवरील देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिल्या आहेत.

दरवर्षी महिनाभर देवीचा यात्रोत्सव चालतो. या कालावधीत मांढरगडावर सुमारे सात ते आठ लाख भाविक येत असतात. कोरोनामुळे यात्रा, जत्रांसह गर्दी होणारे सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी तो पूर्णपणे थांबलेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील यात्रा, जत्रांसाठी प्रशासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER