राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज दिवसभरात ४९ हजार ४४७ करोनाबाधित, तर २७७ रूग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या (Corona) वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर केव्हाही लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आता राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन सुरू करावा लागण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे.

आज दिवसभरात राज्यात ४९ हजार ४४७ करोनाबाधित वाढले असून, २७७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८८ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ६५५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच, राज्यात आज रोजी एकूण ४,०१,१७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान आज दिवसभरात ३७ हजार ८२१ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण २४,९५,३१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.४९ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button