राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढला, गेल्या 24 तासात 6 हजार 112 नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांचा पुन्हा एकदा उद्रेक वाढलेला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6 हजार 112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आज (19 फेब्रुवारी) राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांचे नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 44 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्यार राज्यातील मृत्यूदर 2.48 टक्के इतका आहे. तर दुसरीकडे आज 2 हजार 159 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 87 हजार 632 इतका झाला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात एकूण 44 हजार 765 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात 2 लाख 24 हजार 087 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 588 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER