राज्यात आजही कोरोनाचा उद्रेक ! ६७ हजार ४६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus

मुंबई : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत; पण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याचं राज्य सरकारकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र असे असले तरी राज्यात कोरोनाची भयावह स्थिती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ६७ हजार ४६८ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर ५६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता ६१ हजार ९११ इतका झाला आहे. तर राज्यातला मृत्युदर १.५४ टक्के इतका नोंद झाल्याचं आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

मृतांच्या आकड्यासोबतच नव्या करोनाबाधितांचे आकडेदेखील रोज नवनवे उच्चांक गाठत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात आतापर्यंत राज्यात ४० लाख २७ हजार ८२७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी सध्या राज्यात ६ लाख ९५ हजार ७४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. २४ तासांत राज्यात ५४ हजार ९८५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. मात्र, त्यामुळे रिकव्हरी रेटमध्ये अजूनही वाढ झाल्याचं दिसून येत नाही. राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही ८१.१५ इतकाच आहे. आतापर्यंत राज्यात ३२ लाख ६८ हजार ४४९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी सुखरूप परतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button