राज्यात कोरोना रुग्णांचा स्फोट, गेल्या २४ तासात तब्बल ८ हजार ८०७ नव्या रुग्णांची भर

Maharashtra Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने करोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी राज्याच्या अनेक भागात पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यात लॉकडाउन (Lockdown), संचारबंदी सारखे निर्णय घेतले आहेत. पण रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी उलटी वाढतच आहे. आज राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. आज राज्यात ८ हजार ८०७ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल मंगळवारी ६ हजार २१८ नवे करोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यातुलनेत आजचे प्रमाण जास्त आहे.

राज्यात आज करोनामुळे ८० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७० टक्के एवढे आहे. राज्यात सध्या २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,४४६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अजून ५९ हजार ३५८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २० लाख ८ हजार ६२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER