महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, आज तब्बल 13 हजार 659 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus-Maharashtra

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरानाचा उद्रेक झाल्याचे पुन्हा उघड झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असतांना आज तर हद्द पार झाली आहे. आज राज्यात गेल्या 24 तासांत 13 हजार 659 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

राज्यात आज 13659 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून आज 9 हजार 913 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona) होऊन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 20 लाख 99 हजार 207 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण 99 हजार 008 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21 टक्क्यांवर आलं आहे. पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 2 हजार 515 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER