महाराष्ट्रात आजही कोरोनाचा उद्रेक, आज ५८ हजार ९९३ नव्या करोनाबाधितांची भर

Maharashtra Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळत आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसत आहे. आजही राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचं बघायला मिळालं. आज दिवसभरात राज्यात ५८ हजार ९९३ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.७४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५७ हजार ३२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ५, ३४, ६०३ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

दरम्यान, आज ४५ हजार ३९१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २६,९५,१४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.९६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१६,३१,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,८८,५४० (१५.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९५,०६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,१५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button