ठाण्यात कोरोनाचा कहर सुरूच, २४ तासात १९८ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Thane - Coronavirus

ठाणे : मुंबई शहराला लागून असलेल्या आज ठाणे महापालिका क्षेत्रात १९८ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 1758 झाली आहे. आता पर्यंत २४ तासात रुग्नाची नोंद होण्याचा सर्वात मोठा आकडामानला जात आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोनाच्या तब्बल २९४० नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४,५८२ वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात ३०,४७४ सक्रिय रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात सर्वाधिक ६३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २७ जण मुंबई, पुण्यातील ९, जळगाव ८, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहारात एकाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १५१७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ५८७ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला