कोरोनाची उत्पत्ती चीनमधूनच, चीननं १० ट्रिलियन डॉलरची भरपाई द्यावी – डोनाल्ड ट्रम्प

Donald Trump

वॉशिंग्टन :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा करोना व्हायरसवरुन चीनला लक्ष केलं आहे. करोना व्हायरस हा चीनी व्हायरस आहे आणि तो वुहानच्या प्रयोगशाळेतून आल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. वुहान लॅब थिअरीवरील जागतिक चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी एक विधान जारी केले. ते म्हणाले, प्रत्येक जण, अगदी तथाकथित शत्रूलादेखील असा विश्वास आहे की अध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे बरोबर आहे. वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली. अमेरिका आणि जगभरात झालेल्या विनाश आणि मृत्यूमुळे चीनने भरपाई म्हणून १० ट्रिलियन डॉलर्स द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेची टीम देखील वुहान विषाणूच्या उत्पत्तीची तपासणी करण्यासाठी पोहोचली, जिथे या पथकाने साथीच्या संबंधित गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अहवालात या संघटनेने म्हटले आहे की, वुहान लॅबमधून विषाणूचा उद्भव झाला हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. जोपर्यंत ही टीम चीनमध्ये होती, तोपर्यंत तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले.

तपासात डब्ल्यूएचओ टीमला पूर्णपणे सहकार्य न केल्याचा आणि वुहान लॅबशी संबंधित माहिती लपवून ठेवल्याचा चीनवर आरोप होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात असा दावाही करण्यात आला होता की, नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याच प्रयोगशाळेतून तीन जणांना कोविडसारखी लक्षणे दिसली होती. चीनने हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले होते. कोणत्याही प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना संसर्ग झालेला नाही. हा अहवाल समोर आल्यानंतर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या विषाणूच्या उत्पत्तीची चौकशी करून ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

डॉ. अँथनी फौची यांच्या काही ईमेल्समधून करोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉ. फौची हे चिनी वैज्ञानिकांच्या संपर्कामध्ये होते असे दिसून येत आहे. डॉ. फौची डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे प्रमुख आरोग्य सल्लागार होते. ईमेलमधून समोर आलेल्या माहितीमधून डॉ. फौची चीनच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. जानेवारी २०२० मध्ये पाठविलेल्या या मेलमध्ये असे म्हटले होते की, या विषाणूमध्ये काहीतरी असामान्य आहे. हा विषाणू तयार करण्यात आला आहे. उत्तरादाखल डॉक्टरांनी त्यांना फोनवर बोलण्यास सांगितले. त्यांनी असेही म्हटले आहे की, व्हायरस नैसर्गिकरित्या जन्मला आहे, याची आपल्याला खात्री नाही, याची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे.

ही बातमी पण वाचा : अमेरिकेने आणखी २८ चिनी कंपन्या टाकल्या काळ्या यादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button