ठाकरे सरकारकडून कोरोना आकड्यांची लपवाछपवी, जनतेची दिशाभूल; फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : पीआर यंत्रणेच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्यासाठी मुंबईतील कोरोनामुळे (Corona) मृत पावलेल्यांची नेमकी आकडेवारी उघड न करणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे, त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे, हे जनतेचे दिशाभूल करणारे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महिन्यात रुग्णांच्या आकडेवारीत विक्रमी वाढ झाली आहे तसेच रेल्वे कार्मचारीही मोठ्या संख्येने बाधित झाले आहेत. त्याचबरोबर शेकडो रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ विषाणूशी लढा देताना प्राण गमावले आहेत आणि अशा परिस्थितीतही आपले रेल्वे कामगार जीवाचीही पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. महोदय दिवसेंदिवस कोरोना (कोविड-१९) विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता रेल्वे कामगारांच्या आरोग्याला धोका असून बऱ्याच डेपो/स्थानक येथे कामगारांना कोरोना (कोविड-१९) विषाणूची बाधा झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत तातडीने कारवाई करण्याची गरज असून संदर्भ १ व २ नुसार केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने केलेल्या सूचनांप्रमाणे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात यावी आणि सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना ५० टक्के क्षमतेने बोलविण्यात यावे. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना मागणी करीत आहे की, सदर विषयाची गंभीर दखल घेऊन कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचा विचार करीत केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार आवश्यकतेनुसार ५० टक्के क्षमतेने कामावर बोलविण्यात यावे तसेच सर्व रेल्वे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व रेल्वे हॉस्पिटल तसेच दवाखान्यामध्ये लसीकरणाची सोय तातडीने उपलब्ध करण्यात यावी. आपला सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.

मुंबईतील कोरोना हा प्रशासकीय उपायांमुळे नियंत्रणात आणण्यात आला आहे, असे आभासी चित्र निर्माण केले जाते, याबाबत वारंवार अनेक बाबी मी आपल्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र, दुर्दैवाने प्रत्येक वेळी आभासी चित्र उभे करण्यासाठी अशा कठीण समयीसुद्धा विविध पीआर कंपन्या आणि सेलिब्रिटींचा वापर केला जातो, हे खरोखरच दुर्दैवी आहे.

कोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रुग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रुग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे ‘अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू’ या रकान्यात नोंदवायचे आहेत.

मुंबईतील मृत्युदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. उर्वरित महाराष्ट्रात एकीकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण ०.७ टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेदरम्यान हे प्रमाण ३९.४ टक्के इतके आहे. पहिल्या लाटेतसुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात ०.८ टक्के तर मुंबईत १२ टक्के इतके होते. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्यावतीने सातत्याने होतो आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान एक लाख इतकी आहे, तेथे केवळ सरासरी ३४,१९१ इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत. गेल्या १० दिवसांतील सरासरी आणि त्यातही ३० टक्के या रॅपीड अँटीजेन प्रकारातील आहेत. हे मान्य आहे की, आयसीएमआरने ३० टक्के रॅपीड अँटीजेन चाचण्या मान्य केल्या आहेत; पण, त्या केवळ जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची पूर्ण क्षमता नाही अशा ठिकाणी. जेथे आरटीपीसीआरची पूर्ण क्षमता आहे, तेथे हे प्रमाण १० टक्क्यांवर असता कामा नये. रॅपीड अँटीजेन चाचण्यांची कार्यक्षमता ५० टक्क्यांहून कमी असल्याने त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत तर भर पडते व संसर्ग दर हा कृत्रिमपणे कमी होत जातो.

यातून हे अतिशय स्पष्ट होते की, संसर्ग कमी होतोय हे दाखविण्यासाठी चाचण्यासुद्धा नियंत्रित केल्या जात आहेत. कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच; शिवाय मृत्युदरही वाढतो. परंतु अशा पद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने कोरोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढे येत नाही. याशिवाय, अन्य कारणामुळे होणारे मृत्यू असे दाखवून त्यांचे कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार न केल्यास त्यातून अकल्पित अशा असंख्य संकटांना वेगळेच तोंड द्यावे लागेल, ही बाब वेगळी.

मुंबईतील प्रशासन आणि अधिकारी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी करीत असलेले प्रयत्न मला अजिबात कमी लेखायचे नाहीत. किंबहुना त्याची मी नोंद घेतो आहे. मुंबईतील कोरोना संसर्गाचा आलेख स्थिरावतोय, (प्लाटू होतो आहे) ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. परंतु, आयआयटी कानपूरचे प्रो. मणिंदर अग्रवाल यांनी सांख्यिकी अभ्यासाच्या आधारावर यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मुंबईत कोरोना संसर्गाचे शिखर (पिकिंग) उर्वरित देशाच्या तुलनेत आधीच म्हणजे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच गाठले व त्याच मॉडेलप्रमाणे आता तो स्थिरावताना दिसतो आहे आणि यानंतर तो कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबईमध्ये घडले त्याप्रमाणेच पुणे तथा नागपूर याही ठिकाणी प्लाटुईगची स्थिती दिसून येते आहे. (अर्थात नागपूर या सरकारच्या नजरेतून दूर असतानादेखील तेथेही हे घडते आहे) आता आपण म्हणतोय की, आपण तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होतोय, तर अशा वेळी पीआर संस्थांमार्फत जे चित्र जनतेपुढे निर्माण केले जातेय, ते पूर्णतः दिशाभूल करणारे आणि कोरोनाविरोधातील राज्य सरकारच्या संघर्षाला कमकुवत करणारे आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, ही बनवाबनवी आणि पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button