कोरोना : रुग्णांची संख्या घटली, रिकव्हरी रेट ९४.२८ टक्के!

Coronavirus-Maharashtra

मुंबई :- गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात वाढत असलेली रुग्णांची संख्या रोज ५० ते ६० हजारांच्या घरात पोहोचली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या नव्या रुग्णांची संख्या कमी होते आहे. आज (मंगळवारी) दिवसभरात राज्यात १४ हजार १२३ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ५४ लाख ३१ हजार ३१९ झाला असून रिकव्हरी रेट थेट ९४.२८ टक्क्यांवर गेला आहे. ही मोठी दिलासादायक बाब आहे.

मृतांचा आकडा चिंताजनक

दरम्यान, रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी मृतांचा आकडा ही राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४७७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता ९६ हजार १९८ झाली आहे व मृत्यूदर देखील १.६७ टक्के आहे.

आजच्या १४ हजार १२३ नव्या रुग्णांनंतर राज्यात आजपर्यंत करोनाची (Corona) लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५७ लाख ६१ हजार ०१५ झाली आहे. त्यात २ लाख ३० हजार ६८१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात ३८४ नवे रुग्ण, २८ मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात नवे ३८४ रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत रुग्णांची संख्या ४ लाख ७० हजार ३११ झाली आहे. आज २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ८ हजार २८४ झाली. ८५८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत एकूण ४ लाख ५६ हजार ५०९ रुग्ण बरे झाले आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button