कोरोना : राज्यात आजही आढळलेत ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण; ५१ मृत्यू

Coronavirus-Maharashtra

मुंबई :- राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झपाट्याने वाढतो आहे. काल (शुक्रवारी) ८,३३३ नवे रुग्ण आढळले होते.  आज ८,६२३ रुग्ण आढळलेत. काल राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, आज ५१ चा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर २.४३ टक्के असून, आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात ३,६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत २० लाख २० हजार ९५१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.१४ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,९९,८१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ४६ हजार ७७७ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्हआढळलेत. राज्यात सध्या ३ लाख ३४ हजार १०२ व्यक्ती गृहविलगीकरणात तर ३ हजार ८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज एकूण ७२ हजार ५३० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

खासगी रुग्णालयातही मिळणार लस

भारतात सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन कोरोना लसींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. देशभरात सरकारतर्फे या लसींचे निःशुल्क लसीकरण केले जात आहे. सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही लस देशातील वेगवेगळ्या गटांतील  नागरिकांना दिली जाते आहे. आता खासगी रुग्णालयांमध्येदेखील कोरोनाची लस मिळणार आहे. खासगी रुग्णालयात ही लस सशुल्क घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचे दरदेखील सरकारने निश्चित केल्याचे सांगितले जाते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER