कोरोना : महाराष्ट्रात आज चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सुटी, नवे ३१०६

Maharashtra Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात ४१२२ कोरोना (Corona) रुग्णांना सुटी मिळाली आहे. आतापर्यंत एकूण १७ लाख ९४ हजार ८० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.३ टक्के आहे. आज राज्यात ३ हजार १०६ नवे कोरोना रुग्ण आढळलेत. ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्युदर २.५७ टक्के आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २२ लाख १२ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २ हजार ४५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ९४ हजार ८१५ व्यक्ती होम क्वारंटाईन व ३ हजार ६६० संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात ५८ हजार ३७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज राज्यात ३ हजार १०६ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २ हजार ४५८ झाली आहे. आज नोंद झालेल्या ७५ मृत्यूंपैकी ४२ मागील ४८ तासांमधले आहेत तर १६ मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू औरंगाबाद-४, गोंदिया-३, सांगली-३, नागपूर-२, पुणे-२, सोलापूर-१, वर्धा-१ आणि नाशिक-१ असे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER