कोरोना : महाराष्ट्रात आज आढळलेत ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण, ८० मृत्यू

Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात आज दिवसभरात करोनाचे ३८३७ नवे रुग्ण आढळलेत. ८० रुग्णांचा मृत्यू झाला. मागील २४ तासांमध्ये ४१९६ रुग्णांना सुटी देण्यात आली. राज्यात करोना रुग्णांची एकूण संख्या १८,२३,८९६ झाली आहे. आजपर्यंत एकूण १६,८५, १२२ रुग्ण बरे झाले आहेत. आज महाराष्ट्रात ९०,५५७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण ४७,१५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १६,८५,१२२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.३९ टक्के आहे व मृत्यू दर २.५९ टक्के आहे. आजपर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख २३ हजार ८९६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० संशयित रुग्ण होम क्वारंटाइन आणि ६३५४ संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात ९० हजार ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER