कोरोना : महाराष्ट्रात आज २७०० पेक्षा जास्त रुग्ण झाले बरे; नवे ४२६८

Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात आज २७७४ रुग्ण बरे झालेत. एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.४६ टक्के झाला आहे. दरम्यान, आज राज्यात नवे ४ हजार २६८ कोरोना रुग्ण आढळलेत. ८७ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात रुग्णांच्या मृत्यूचा दर २.५७ टक्के आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण १ कोटी १५ लाख ७० हजार १३७ नमुन्यांपैकी १८ लाख ७२ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात ५ लाख ३२ हजार २८८ व्यक्ती होम तर ५ हजार १२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. ७३ हजार ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १८ लाख ७२ हजार ४४० झाली आहे. आज नोंद झालेल्या ८७ मृत्यूंपैकी ३८ मागील ४८ तासांमधले आहेत. तर २३ मृत्यू मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित २६ मृत्यू एक आठवड्यापूर्वीपेक्षा कमी कालावधीतले आहेत, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER