कोरोना : महाराष्ट्रात एकूण ११ लाखांपेक्षा जास्त रुग्ण झालेत बरे, नवे १६, ४७६

Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात मागील २४ तासात कोरोनाचे १६ हजार १०४ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ७८.८४ टक्के झाला आहे. मागील चोवीस तासांमध्ये १६ हजार ४७६ नवे रुग्ण आढळले आहेत व ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णांचा मृत्यू दर हा २.६५ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६८ लाख ७५ हजार ४५१ नमुन्यांपैकी १४ लाख ९२२ नमुने ‘पॉझिटिव्ह’ आढळले. सध्या राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ संशयित रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. यातील २८ हजार ७२० संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज राज्यात २ लाख ५९ हजार ‘अॅक्टिव्ह’ रुग्ण आहेत.

आज महाराष्ट्रात १६ हजार ४७६ नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १४ लाख ९२२ झाली आहे. आज नोंद झालेल्या ३९४ मृत्यूंपैकी २२९ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत आणि १०३ मागच्या आठवड्यातले आहेत. तर उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Check PDF :-प्रेस नोट १ आक्टोबर २०२०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER