कोरोना : नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या आज जास्त

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात आज ३ हजार ६५ रुग्ण बरे झाले असून नवे २ हजार ५४४ आढळलेत. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. ६० रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात रुग्णांचा रिकव्हरी रेट ९२.४५ टक्के आहे. सध्या राज्यात ८४ हजार ९१८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत एकूण १६ लाख १५ हजार ३७९ रुग्ण बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९१ नव्या रुग्णांची नोंद झाली. दोघांचा मृत्यू झाला. ८१ रुग्ण बरे झालेत. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांची एकूण संख्या ८९ हजार ६०० वर पोहचली असून यातील ८६ हजार ५२९ बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९९ असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

स्वदेशी लसींपासून आधुनिक निदान केंद्रांपर्यंत सर्व माध्यमातून भारताने कोविड- १९ (COVID-19) साथीला एकात्मिक प्रतिसाद दिला असून साथीवर काही प्रमाणात मात करणे शक्य झाले, असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.

दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली तरी कोरोना (Coronavirus) संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्णांच्या प्रमाणानुसार जिल्ह्यातील रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्यांना दिल्या आहेत. कोरोना आणि अन्य रुग्णांच्या उपचारांचा मेळ साधण्यासाठी आधुनिक सुविधांसह उपचार विशेष (सुपर स्पेशालिटी) रुग्णालये कोरोना रुग्णालये म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. यामुळे अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER