करोना व्यवस्थापन : ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाने केली प्रशंसा

NITI Aayog

मुंबई : करोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत सुरुवातीला भयावह परिस्थिती निर्माण झालेल्या मुंबईतील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येते आहे. सुरूवातीला मुंबईत करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने रुग्णांची बेडसाठी प्रचंड हेळसांड झाली. मात्र, नंतर विविध उपाययोजना करत आणि बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या वाटपात सुसूत्रता आणत मुंबई महापालिकेने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले; यासाठी महापालिकेच्या करोना व्यवस्थापनाचे सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही (NITI Aayog) कौतुक केले आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांची प्रशंसा करताना केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणालेत – “केंद्रीय पद्धतीने बेडचे वाटप, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, इतकेच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करने आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ‘डॅशबोर्ड’ तयार करणे, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणे. असे मुंबईचे करोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचे अभिनंदन.”

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील करोना व्यवस्थापन मॉडेलचा दाखला दिला होता. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या दोन सदस्यीय खंठपीठाने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात मुंबई महापालिकेने तयार केलेले मॉडेल देश आणि राज्यस्तरावर शक्य आहे का?, अशी विचारणा केली होती.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button