कोरोना : महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ८५.१६ टक्क्यांवर, २४ तासांत ८९१ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई :- गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात करोनाच्या (Corona) नव्या रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. मात्र, करोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात अजूनही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ८९१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या आकडेवारीत दिली आहे. राज्यातल्या रुग्णांच्या मृत्यूचा एकूण आकडा आता ७१ हजार ७४२ झाला आहे. मृत्यूदर आजच्या आकडेवारीनंतर १.४९ टक्के आहे.

रिकव्हरी रेट वाढल्याने मोठा दिलासा

मंगळवारी राज्यातला रिकव्हरी रेट ८५.१६ टक्के आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल ६५ हजार ९३४ रुग्ण बरे झालेत. ५१ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात करोनामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या नव्या करोनाबाधितांपेक्षा जास्त झाली आहे.

आत्तापर्यंत राज्यात एकूण ४८ लाख २२ हजार ९०२ नागरिकांना करोनाची लागण झाली असून ४१ लाख ७ हजार ०९२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण करोनाबाधितांपैकी सध्या ६ लाख ४१ हजार ९१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button