कोरोना : महाराष्ट्रात अजूनही धोका सर्वाधिक; मोदींचा इशारा

PM Narendra Modi

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा (Corona) धोका हा अद्याप मिटला नाही. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत हयगय करू नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला केली. दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात ते आज (१३ ऑक्टोबर) बोलत होते.

मोदी म्हणाले – सर्वांना हात जोडून विनंती आहे, मास्क लावा, हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा. आपण ही लढाई जिंकणार, जिंकायची आहे, जिंकणारच.

बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले होते. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचा विकास हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. राजकारण करतानासुद्धा समाजाचे प्रश्न सोडवण्यावर माझा नेहमी भर राहिला, असे बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“सहकारितेला निधर्मी चळवळ मानून त्यांनी सहकाराद्वारे गावांचा विकास केला. ‘देह वेचावा कारणी’ या संत तुकाराम महाराजांच्या शब्दांमध्ये बाळासाहेब विखे पाटलांच्या जीवनाचे सार आहे, असे ते म्हणाले.

या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) तसेच विविध पक्षांचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

अनेक गौप्यस्फोट
परखडपणे मत व्यक्त करणारे नेते म्हणून ओळख असणारे बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रवेश ते राजीनामा, पवार – विखे संघर्षाची किनार, राजीव गांधी यांच्या काळात उभारलेला युथ फोरम, पुलोद स्थापनेवेळी शरद पवारांचे स्थान यासह अनेक राजकीय संघर्षावर बाळासाहेब विखे-पाटील यांनी आत्मचरित्रात भाष्य केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER