कोरोना : महाराष्ट्रात आजही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त !

Maharashtra Coronavirus

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे (Corona) रोज हजारांनी रुग्ण आढळत असताना दिलासादायक बाब म्हणजे रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासात राज्यात १९ हजार ९३२ रुग्ण बरे झालेत व ११ हजार ९२१ नवे आढळले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ७७.७१ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

आज दिवसभरात राज्यात ११ हजार ९२१ नवे रुग्ण आढळले, १८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकूण १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण १३ लाख ५१ हजार १५३ रुग्णात २ लाख ६५ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, सुटी मिळालेले १० लाख ४९ हजार ९४७ आहेत. आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३५ हजार ७५१ रुग्णांचा यात समावेश आहे.

देशात आजपर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. एक दिवसात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER