कोरोनाने आपण जवळची माणसे गमावली; डॉक्टरांसोबत बोलताना पंतप्रधान मोदी भावुक

PM Narendra Modi - Maharashtra Today

नवी दिल्ली :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या संकटाला तोंड देत अनेकांना प्राण गमवावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावुक भावूक झाले. कोरोनांशी (Corona) दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावले, असे मोदी म्हणाले. मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासीयांचे आभार मानतो.

विशेषकरून आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले. आपण कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो, पण आपल्याला आता वाराणसी आणि पूर्वांचलमधील गावांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. आता आपल्याला ‘जहाँ बीमार, वही उपचार’ या मंत्राने काम करावं लागेल, आवाहन मोदींनी केले आहे.

Discalimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button