३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

pm modi

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासीयांचे आभार मानत कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले.

यावेळी ते म्हणाले की, इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोना रोखण्यासाठी जास्त प्रयत्न केले. यामध्ये तुम्हीदेखील मदत केली. कोरोनाचा एकही रुग्ण नसताना भारताने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग सुरू केली होती. १०० पर्यंत पोहचण्याआधी परदेशी नागरिकांना आयसोलेशन होण्यास सांगण्यात आलं होतं. ५५० प्रकरणं असताना २१ दिवसांचा लॉकडाऊनचा मोठा निर्णय जाहीर केला. भारताने समस्या वाढेल याची वाट पाहिली नाही. समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन त्याचवेळी रोखण्याचा प्रयत्न केला, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

इतर देशांशी तुलना करणं योग्य नाही. पण भारताच्या तुलनेत त्यांची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. भारतानं योग्य पावलं उचलली नसती, वेळेवर निर्णय घेतले नसते तर आज भारताची स्थिती काय असती याची कल्पनाच करवत नाही, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. भारताने घेतलेल्या निर्णयांची आज जगभरात चर्चा सुरू आहे, असं यावेळी मोदींनी म्हटलं.


Web Title : Corona lockdown will continue till may 3 – PM Narendra Modi

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)