रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवर सुरक्षा रक्षकांचा कडेकोट पहारा

corona -Security At the ports in Ratnagiri district

रत्नागिरी/प्रतिनिधी : कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन असतानाही मुंबई, पुण्याकडून रत्नागिरीत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यावर लोकांनी समुद्रमार्गे येण्यास सुरुवात केल्यामुळे हे टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवर 24 तास सुरक्षा रक्षकांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर मत्स्यविभागाने सागरी सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून कडक बंदोबस्त ठेवला आहे. सद्यस्थितीत बंदरावर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे. मिरकरवाडा, भगवती बंदर तसेच जिल्ह्यातील प्रमुख मासळी उतरवण्याच्या बंदरावर सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. शासनाने संचारबंदी लागू केली असली तरीही मुंबईतून सागरी मार्गाचा वापर करून बोटीने काही लोक कोकणात येत आहेत. हे रोखण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षक २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. रत्नागिरी विभागामध्ये कोरोनाचा प्रसार थांबवणे व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे यासाठी मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी काम करत आहेत.