सलमानची दिलदारी : फिल्म इंडस्ट्रीतील १६ हजार कामगारांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा

Salman Khan

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या दिलदार स्वभावासाठी नेहमीच चर्चेत राहिला आहे. सलमानने आज फिल्म इंडस्ट्रीतील १६ हजार कामगारांच्या बँक खात्यात एकूण ४ कोटी ८० लाख रुपये जमा केले आहेत.

सलमान मे महिन्यात आणखी १९ हजार कामगारांना मदत करणार आहे. त्याने सिनेसृष्टीतील कामगारांसाठी दोन महिन्यांत १० कोटी ५० लाख रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही मदत तो दोन टप्प्यांमध्ये करत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याची मदत त्याने केली आहे. दुसऱ्या टप्प्यात तो ५ कोटी ७० लाखांची मदत करणार आहे.

मजुराच्या खात्यात प्रत्येकी ३००० रुपये जमा

सलमान खान फिल्म प्रॉडक्शनने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे सचिव अशोक दुबे यांच्याजवळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या मजुरांचे बँक अकाउंट नंबर मागितले होते. यापैकी १९ हजार कामगारांच्या बँक अकाउंट संदर्भातील माहिती काल (६ एप्रिल) संध्याकाळी देण्यात आली. सलमानच्या ऑफिसमध्ये या कामगारांच्या बँक अकाउंटची माहिती मिळताच संपूर्ण टीम तातडीने कामाला लागली. टीमने १६ हजार कामगारांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी ३००० रुपये जमा केले. हे वृत्त टीव्ही-९ने दिले आहे.

बॉलिवूड म्हणते, ‘फिर मुस्कुराएगा इंडिया’, फिर से होगी सपनो की उडाण; स्फूर्तिदायक अँथम रिलीज


Web Title : Salman deposits funds in the account of 3,000 workers in the film industry

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)