
सोलापूर : पंढरपुरातील (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर, सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर कोरोनामुळे (Corona) आठ महिने बंद होते. त्यानंतर मंदिरे सुरू झाली; पण आता पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने ती बंद झाली. त्यामुळे गेल्या वर्षभरात धार्मिक पर्यटनाला (Religious tourism) सुमारे ७०० कोटी रुपयांहून अधिकचा फटका बसला आहे.
विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी वर्षाकाठी एक कोटीहून अधिक भाविक पंढरपूरला येतात. यात माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी या चार यात्रांना विशेष महत्त्व आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेला भाविक अर्पण केलेले पैसे, दानपेटी, प्रासादिक लाडू, निवास व्यवस्था, परिवार देवतांच्या चरणी अर्पण केलेले दान, असे मिळून १० कोटी रुपये उत्पन्न मिळते. दैनंदिन मिळणारे उत्पन्नही मोठे आहे. कोरोनामुळे हे उत्पन्न खंडित झाले आहे. वर्षाकाठी बाजारपेठेत ५०० कोटींची उलाढाल होते. परंतु, ती उलाढाल थांबली.
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर, सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर असे धार्मिक पर्यटनाचा मार्ग भाविकांचा ठरलेला आहे. परंतु, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे देऊळ बंद ने धार्मिक पर्यटन अडचणीत आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला