नाशिकमध्ये नवे निर्बंध!

नाशिक :- शहरात दिवसोंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Virus Crises) पुन्हा वाढत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी नवे निर्बंध लागू करण्यासंदर्भातील पत्रक जारी केले आहे. या निर्बंधांमध्ये १५ मार्चपासून मंगल कार्यालये, हॉल्स आणि अन्य ठिकाणी लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत मंगल कार्यालय मालकांनी लग्नासाठी हॉल देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. नाशिकमध्ये चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने नव्याने निर्बंध लागू करण्यासंदर्भातील मुद्द्यांचा समावेश करून पत्रक जारी केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:-

  1. विकेण्ड लॉकडाऊन – जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या कालावधीमध्ये सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, भाजीपाला, फळे, किराणा, दूध आणि वृत्तपत्र वितरण यांना सूट देण्यात आलीय. याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता विकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील.
  2. १५ मार्चपर्यंत नियोजित कार्यक्रम स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेऊन कोरोना नियमांचे पालन करून आयोजित करण्यात यावेत.
  3. खाद्यगृहे, परमिट रूम किंवा बार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच परवानगी देण्यात यावी, अशी अट घालण्यात आलीय. होम डिलेव्हरी सुरू राहणार.
  4. जिम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉमप्लेक्स, स्विमिंग पूल हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहील. सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही.
  5. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व उत्सव आणि समारंभांवर बंदी.
  6. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. शनिवार, रविवार मंदिरे पूर्णपणे बंद राहणार.
  7. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेसह सुरू. एक दिवसाआड बाजू वाटून हा कारभार केला जाईल.
  8. नाशिक व मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
  9. जिल्ह्यातील नाशिक, नांदगाव, निफाड आणि मालेगाव तालुक्यातील १० मार्चपासून शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
  10. मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक. कोरोना प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती करण्यात यावी.

हे निर्बंध रात्री ९ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER