कोरोना : क्रिकेटसाठी आयसीसीकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Corona lockdown,ICC Releases Post-COVID Guidelines

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे बंद पडलेली क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी आयसीसीने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ‘आयसीसी बॅक टू क्रिकेट मार्गदर्शक तत्त्वे’मधील आंतरराष्ट्रीय संघटनेने हे स्पष्ट केले आहे की, व्यक्ती किंवा समुदायाच्या आरोग्यावर कुठलीही तडजोड होणार नाही हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. तसेच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

ही बातमी पण वाचा:- चाहते नाही, लाळ नाही, बाऊंड्रीवर हँड सॅनिटायझर्स …

आयसीसीच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी वैद्यकीय प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार हे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडू त्यांची टोपी, टॉवेल, गॉगल, स्वेटर अंपायरकडे देऊ शकणार नाही, तसंच खेळाडूंनी एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवावं. पण खेळाडूंचं सामान कोणाकडे ठेवायचं हे आयसीसीनं सांगितलं नाही.

एवढंच नाही तर अंपायरने बॉल पकडताना हातमोजे वापरावेत, अशा सूचनाही आयसीसीने केल्या आहेत. विशेषत: पंच, सामना रेफरी आणि साहाय्यक कर्मचारी यांना कोरोनाचा जास्त धोका असतो. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांचा यात समावेश आहे. आयसीसीच्या नव्या नियमांनुसार खेळाडूंना चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करण्यास मनाई आहे. तसेच पंचांना हातमोजे घालणे अनिवार्य आहे. परंतु चेंडूला लकाकी देण्यासाठी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्याबाबत ‘आयसीसी’ने अद्याप काहीही अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER