
पुणे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. याची खबरदारी म्हणून पुणे महानगरपालिकेने (Pune Mahanagar palika) रात्रीची संचारबंदी (Curfew maintained) कायम ठेवली आहे. यात अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना मुभा दिली जाणार, तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार, अशी माहिती महापौरांनी दिली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय पुन्हा वाढवण्यात आला आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत.
शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच ठेवणार !
पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 28, 2021
याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी ट्विट करून माहिती दिली. “शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच ठेवणार! पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल.” अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला