मुंबईत बोर्डिंग पास ‘ई-पास’ म्हणून ग्राह्य; मुंबई पोलिसांची माहिती

Boarding pass in Mumbai accepted as e-pass

मुंबई :- मुंबईत बोर्डिंग पास ‘ई-पास’ म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. विमान प्रवाशांसाठी खासगी वाहनांच्या पीकअप, ड्रॉप सेवेसाठी त्यांचा बोर्डिंग पास हा डिजिटल पास म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पास काढण्याची आवश्यकता नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहेत. याला मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दुजोरा दिला आहे.

ही बातमी पण वाचा : संक्रमित पृष्ठभाग किंवा प्राण्यांनी कोविड-१९चा प्रसार होत नाही..

दरम्यान मुंबई विमानतळावरून मंगळवारी २२ विमानांनी टेकऑफ केले, तर १९ विमानांचे आगमन झाले. तीन विमानांची उड्डाणे रद्द झाली. देशांतर्गत विमान प्रवास सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी ४१ विमानांची वाहतूक झाली. या सेवेचा लाभ ४,२२४ प्रवाशांनी घेतला.


Web Title : Boarding pass in Mumbai valid as e-pass; Mumbai Police Information

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER