शाळा गजबजल्या : दहा महिन्यानंतर वाजली घंटा

पुणे : अखेर शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा दिसत आहे. कोरोनामुळे (Corona lockdown) तब्बल १० महिन्यांपासून बंद असणारे पाचवी ते आठवीचे वर्ग काल, बुधवारपासून सुरू झाले. यामुळे शाळा परिसर पुन्हा गजबजून गेला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायझेशन करून आणि पालकांचे संमतीपत्र पाहूनच विद्यार्थ्यांना शाळेत (Schools opened) प्रवेश दिला जात आहे.

शाळांचे पहिले सत्र हे जून ते नोव्हेंबर असे असते; पण कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. शासनाने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू झाले; पण पाचवी ते आठवीचे वर्ग केव्हा सुरू कधी होणार याबाबत शंका होती.

२७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला. शाळांची वेळ व वेळापत्रकाची माहितीही जाहीर करण्यात आली. बुधवारपासून काही शाळा सकाळच्या टप्प्यात, तर काही दुपारी सुरू करण्यात आल्या. ज्या शाळांचा विद्यार्थी पट कमी आहे त्यांना पूर्ण क्षमतेने, तर पट जास्त आहे त्यांना ५० टक्के उपस्थितीत शाळा सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER