मराठी चित्रपटसृष्टीला ६०० कोटींचा फटका

Marathi film industry.jpg

मुंबई :- कोरोनामुळे (Corona) मराठी चित्रपटसृष्टीला (Marathi film industry) ब्रेक लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत मराठी चित्रपटसष्टीला ६०० कोटींचा फटका बसला आहे. चित्रीकरणासाठी सध्या परवानगी असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये विरोध होत आहे. दिग्दर्शक, निर्मात्यांना आणि कलाकारांना अडचणी येत असून, अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाही चित्रपटगृह बंद असल्याने तेही अडचणीत भर पडली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तयार असले, तरी त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल की नाही, याबाबत निर्माता आणि दिग्दर्शकांमध्ये संभ्रम आहे. मराठी चित्रपटसृष्टीची वर्षभरात सुमारे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. गेल्या सात महिन्यांत ६०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या आर्थिक नुकसानीमुळे येत्या पुढील दोन वर्षांत जे नवोदय निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपटसृष्टीत येऊ इच्छित होते, त्यांनी दुसऱ्या व्यवसायाकडे मोर्चा वळवला आहे. येत्या काळात नवीन मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या कमी होणार आहे. संख्या कमी झाली तर कलाकार आणि पडद्यामागील कलाकारही इतर क्षेत्राकडे वळले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा पूर्वपदावर येण्यास अजून किमान सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER