कोरोनाची जबाबदारी शासनाची प्रशासनाची नाही : फडणवीस

Devendra Fadnavis

सांगली : सांगली (Sangli) कोरोनाच्या (Corona) परिस्थितीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शासनाला जबाबदार धरले. कोरोनाबाबतची जबाबदारी प्रशासनाची नसून शासनाची असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.

सांगली जिल्ह्याचा दौरा करून देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सांगलीतील कोरोना बाबतीत राज्य शासन गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच राज्य सरकार म्हणावं तितकं प्रशासनाला सपोर्ट करत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, की महात्मा जन आरोग्य योजनेत रुग्णांना लाभ मिळत नाहीत. खासगी रुग्णालयात ही योजना बंद केले असल्याबाबत माहिती मिळत आहे. रुग्णांना इंजेक्शनचा खर्च न परवडणारा नाही. शासनाने या सर्व बाबींची तात्काळ नोंद घेऊन ठोस कार्यवाही करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER