चक्रीवादळापेक्षाही कोरोना वादळ मोठे, आधी ते थांबवा ; संजय राऊतांचे पुन्हा केंद्राला खडेबोल

Sanjay Raut-PM Modi

मुंबई :- देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर शिवसेनेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारला (Center govt) खेडेबोल सुनावले आहे . वादळ येत आणि जात असतं. पण या चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेले कोरोना वादळ मोठं (Corona is more dangerous) आहे. आधी ते थांबवा. त्यासाठी काम करा, अशा शब्दात राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले . आज प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला .

चक्रीवादळ पेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ निर्माण झालं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. ते आधी थांबवलं पाहिजे. बाकीचे वादळ येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचं काय करणार?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी लसीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले . लसीकरणा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. लवकरच त्यातून मार्ग निघेल, असे राऊत म्हणाले.

नाना पटोले (Nana Patole) यांनी काल ते भाजपमध्ये असताना त्यांचे फोन टॅप केले जात होते असा दावा केला होता. त्यावरही राऊत यांनी भाष्य केले. देशांमध्ये कोणाचे फोन टॅपिंग होत नाही हे सांगा. आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील. हा आता राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टायपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका. फोन टॅपिंग ही काही मोठी गोष्ट नाही, असं राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राऊतसाहेब डोळे उघडा, किती यादी सांगू?, भाजपचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button