कॉन्टक्ट ट्रेसिंग शून्य असल्याने राज्यात कोरोना वाढतोय; मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारवर निशाणा

CM Uddhav Thackeray - MNS Raju Patil

कल्याण : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढतच चालले आहे . हे पाहता राज्य सरकार कॉन्टक्ट ट्रेसिंग बद्दल एकदम शून्य आहे. त्यामुळे अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात झपाट्याने कोरोना वाढतो. हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केली आहे.

कोरोना आजाराविषयी नागरिकांध्ये संभ्रम होता. बाधितांची नावे जाहीर केली जात नाही. मात्र आत्ता तशी परिस्थिती नाही. सरकारने रोजच्या रोज कोरोना बाधितांची यादी जाहीर करावी. तशा प्रकारचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यावे. कोरोना बाधितांची यादी जाहीर झाल्यावर त्यांच्या संपर्कात आलेले स्वत:हून कोरोना चाचणी करुन घेण्यास पुढे येतील. तसेच अन्य लोकही सावध होतील. त्याचबरोबर कोरोनाची आकडेवारी येत आहे. ती खोटी की खरी याची शहानिशा होण्यास मदत होईल. कोरोना वाढतोय म्हणून सरसकट सामान्य जनतेला लॉकडाऊनमध्ये ढकलण्यापेक्षा जे बाधित व संपर्कात आलेले आहे. त्यांच्यावर लक्ष देण् सोपे होईल. कोरोना आटोक्यात आणण्याची तीव्र इच्छ ठाकरे सरकारची आहे असे मानून सरकार निर्णय घेईल, अशी आशा आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका सुरुवातीला कोरोना बाधितांची नावासह यादी जाहीर करत होती. त्यानंतर ही यादी देणे बंद केले. केवळ आकडेवारीच दिली जात आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात बेडची कमतरता आहे. रुग्णालयात किती बेड आहेत. किती रिक्त आणि किती भरलेले आहेत. याची माहिती डॅशबोर्डवर दिली गेली पाहिजे. तशी माहिती दिली जात होती. मात्र महापालिकेच्या हद्दीत कोरोनाची खाजगी रुग्णालये आहे. महापालिकेच्या वेबसाईटवर गेल्यास उपलब्ध बेडचा डॅशबोर्डचा तक्ता पाहिल्यास अनेक रुग्णालये त्यांची माहितीच अपडेट करत नसल्याने उपलब्ध बेड किती आहे याची माहिती मिळणे नागरीकांना कठीण होऊन बसले असल्याच्या मुद्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button