शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण ; आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा

Varsha Gaikwad

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( varsha Gaikwad) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे . त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या, असे ट्विट गायकवाड यांनी केले .आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

“वर्षाताई गायकवाड आपण काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. आपण धारावीमध्ये केलेले कार्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. आपण लवकरच बरे होऊन पुन्हा जोमाने कार्यरत व्हाल हा विश्वास आहे , पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, “धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी केलेले अविरत प्रयत्न असतील किंवा या संकट काळात शिक्षण विभाग हाताळणे असेल हे अत्यंत कौतुकास्पद आहे. वर्षा गायकवाड आपण लवकर बऱ्या होऊन पुन्हा जोमाने जनसेवेला लागा. आमच्या व तमाम महाराष्ट्राच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत, असे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER