बच्चू कडू यांना कोरोनाची लागण ; लढवय्या नेत्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा पाऊस

Bacchu Kadu Corona Positive

अकोला : राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली.

टविटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला असूनन माझा्या संपर्कात आलेल्यां सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्या असे बच्चू कडू यांनी कळकळीने सांगितले आहे.

एखाद्या अभिनेत्याचे चाहते असावे तसेच राज्यात बच्चू कडूचा एक वेगळा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या नेत्याचे कोरोना झाल्याचे ट्विट पाहताच त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
तर, एक जण म्हणतात, संपर्कात तर आसूड यात्रेदरम्यान आलो होतो.वाण नाही पण गुण नक्की लागलाय तुमचा.किती ती तळमळ शेतकऱ्यांसाठी. तुमच्यासोबत सिएम टू पिएम् , नागपूर ते वडणगर ची संघर्ष आसूड यात्रा, माझ्या आयुष्यातील अविस्मणीय असे १३ दिवस होते ते. आता थोडा आराम करा भाऊ.

तर, कोणी, काळजी घ्या

साहेब . आपण लढवैये नेते आहात, आजारावर मात करून पुन्हा बळीराजाच्या सेवेत जोमाने दाखल व्हाल असा मला विश्वास आहे. अशाप्रकारे बच्चू कडूंना आराम करण्यास त्यांच्या समर्थकांनी सांगितले आहे.

बच्चू कडू विदर्भातील दबंग नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे राहणीमान, गावाकडचीच भाषा यावरूनही अनेकांना ते आपलेसे वाटतात. बच्चू कडूही लोकांत मिसळून राहतात. कोरोना काळातही ते आवश्यक ती काळजी गेऊन लोकांच्यात होते. स्वतः रुग्णालयाची तपासणी करणे, शेतक-यांच्या गावात जाऊन त्यांची विचारपूस करणे अशी सर्व नित्यांची त्यांची कामे सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER