माजी पंतप्रधान मनमोहन सिंग याना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल

Manmohan Singh - Corona Positive

नवी दिल्ली :- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Sing) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यानंतर सिंग यांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एम्समध्ये ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबद्दल एम्स प्रशासनाने माहिती दिली. मनमोहन सिंग हे ८८ वर्षांचे आहेत.

देशात वाढत्या रुग्णसंख्येवरून मनमोहन सिंग यांनी कालच पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिले होते. सिंग यांनी कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी पत्रातून काही उपाय सरकारला सुचवले आहे. या पत्राला आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी उत्तर दिले. सिंग यांनी सांगितलेले सर्व उपाय आठवड्याभरआधी सुरू केले आहेत, असे केंद्राने म्हटले.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लवकर बरे व्हा, असे ट्विट केले आहे. त्याचबरोबर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सुद्धा लवकर बरे व्हा, असे ट्विट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button