मुंबई येथून आलेल्या रेल्वे पोलिसांच्या सहा जवानांना कोरोनाची लागण

Railway Protection Force

सोलापूर : कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर बंदोबस्तासाठी मुंबई येथून आलेल्या रेल्वे पोलिसांच्या १० जवानांपैकी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिली. वळसंग येथेही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ८० झाली आहे.

मुंबई येथून रेल्वेचे १० जवान आले होते. त्यांना कुर्डुवाडीला नियुक्त करण्यात आले होते. ३ जूनच्या रात्री त्यांना बरे वाटत नव्हते म्हणून तपासणीसाठी रेल्वेच्या दवाखान्यात पाठवण्यात आले. त्यांना ताप आणि खोकला असल्याने उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले. आज त्यांच्या तपासणीचा अहवाल मिळाला त्यात सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे कळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER