धक्कादायक : राज्यात १८०९ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्य पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आज दिवसभत ५१ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत एकूण १८०९ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत १८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . तसेच ६७८ पोलिसांनी कोरोनावर मात केली .

ही बातमी पण वाचा:- कोविड-१९ प्रभावित देशांमध्ये भारत १०व्या क्रमांकावर….

दरम्यान काल एका दिवसात पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. तर आज ८७ पोलिसांना लागण झाली आहे. एका दिवसात २०० पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत १८३ अधिकारी आणि १५७५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. १३१ अधिकारी आणि ९३६ अशा एकूण १०६७ पोलिसांत लक्षणे दिसून येत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER