केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

Nitin Gadkari

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे .राजकीय नेतेही कोरोनच्या विळख्यात सापडले असून आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनची लागण झाली आहे .

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

“काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण केले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा”, असे ट्वीट नितीन गडकरी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER