रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू; जिल्ह्यातील सहावा बळी

Corona-infected patient dies at Ratnagiri

रत्नागिरी/प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना शनिवारी सकाळी आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण १८ मे रोजी मुंबईहून आला होता व २२ तारखेला रुग्णालयात दाखल झाला होता. २३ मे रोजी याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे.

मात्र सकाळपासून या रुग्णाच्या नातेवाइकांशी संपर्क झाला नसल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. बाधितांचा अंत्यविधी रत्नागिरीत करण्याला विरोध होत असून आतातरी प्रशासन ठाम भूमिका घेणार का याकडे नागरिकांचे लक्ष आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER