कोरोना : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सगळ्यात जास्त, सुमारे ८० टक्के

corona virus

नवी दिल्ली : सध्या जगात कोरोना हा जीवघेणा आजार ठरला आहे. भारतातही रोज लाखाच्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. मात्र यात एक मोठी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगात भारतात सर्वांत जास्त म्हणजे ७९.२८ टक्के आहे.

गेल्या २४ तासांत ९५,८८० रुग्ण बरे झाले आहेत. १६ सप्टेंबरपासून भारतात दररोज ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत एकूण ४२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारीही कमी झाली आहे. सध्या ही टक्केवारी फक्त १.६१ आहे.

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९३,३३७ रुग्ण आढळले आहात. १,२४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५३,०८,०१५ झाली असून त्यातील १०,१३,९६४ ऍक्टिव्ह श्रेणीतील आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

कोरोनाची साथ भारतात २०२१ मध्ये नियंत्रणात येईल, असा अंदाज भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला आहे. २०२१ च्या मध्यापर्यंत कोरोनाचे संकट कमी होईल, स्थिती सामान्य होईल, अशी शक्यता एम्सच्या (AIIMS) कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER