कोरोनामुळे सायकलिंगचा ओढा वाढला

Coronavirus - Cycling

सांगली : लॉकडाऊननंतर (Lockdown) जनजीवन जसजसे पूर्वपदावर येत आहे. तसे अनेकांनी या शारीरिक व्याधींचा धसका घेत नियमित व्यायाम करणे सुरु केले आहे. वजन घटविण्यासाठी अनेकांनी घरात अडगळीत असलेल्या सायकली दुरुस्त करून घेतल्या आहेत. बऱ्याच जणांनी नव्या खरेदी केल्या आहेत. पाच हजारांपासून ते लाखांपर्यंत किमतीच्या नवनव्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, नोकरदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हे सायकलीचे फॅड वाढले आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये वाहतूक व्यवस्था बंद असल्याने सायकल व त्यांच्या सुट्या भागांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाला आहे.

अतिशय सुखकर, हलके, स्वस्त, विना कटकटीचे, विना प्रदुषणाचे, तब्येतीला चांगले असे वाहन. विशेषत ज्यांचे शाळा, कॉलेज, ऑफीस ५-१० किमीच्या परिघात आहे त्यांनी तर आवर्जून घ्यावे. कोरोना (Corona) मुळे व्यायामाची ओढा वाढत असताना यातून सायकल संस्कृती पुनरज्जीवीत होत आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर सायलक स्वारांची गर्दी दिसते. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी शहर परिसरासह जोतीबा पन्हाळा, राधानगरी, महामार्गावरुन लांबपर्यंत सायकल टूरचे आयोजन केले जात आहे.

१८८० मध्ये रॉयल मेलया ब्रिटिश माणसाने पहिली सायकल चालवण्यास सुरुवात केली. इतर खेळांसारखा हा हि एक खेळ प्रकार आहे ज्यात जास्त कौशल्य ची गरज नाही. शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, आजार कमी होण्यास मदत होते. सायकलिंगमुळे जीवाश्म इंधन, कमी हवा किंवा ध्वनी प्रदूषण कमी होते आणि रहदारीच्या जास्तीतजास्त घट कमी होते. सायकल हा कमी खर्च, सोपा व्यायाम व कधीही व कुठेही चालवता येते. सर्व खेळाडूंसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. शरीराला दुखापत कमी होते. सायकल हा एरोबिक्स व्यायाम प्रकार आहे. ज्या मध्ये कमीत कमी ताण पडतो व दुखापत कमी होते. मांसपेशींना आकार प्राप्त होतो. शरीराचा सर्वात मोठ्या मांसपेशींचा ग्रुप वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजनावर नियंत्रण राहते. सायकल चालवण्याने वजन लवकर कमी होते. पचनक्रिया सुधारते, मासपेशींना आकार येतो. चरबीचे प्रमाण कमी होते. एका तासात ५०० ते ८०० उष्मांक सायकलिंग मुळे खर्च होतात. वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून ३ दिवस सायकलिंग जरूर करावे, असे तज्ज्ञ सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER