कोरोना : गेल्या २४ तासांत राज्यात आढळलेत १४,३१७ नवे रुग्ण, ५७ चा मृत्यू

Coronavirus Maharashtra

मुंबई : राज्यातल्या दिवसभरातल्या करोना आकडेवारीमुळे करोनाचे (Corona) भीषण रुप समोर आले. गुरुवारी दिवसभरात राज्यात १४,३१७ नवे रुग्ण आढळलेत. ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसते आहे.

गेल्या २४ तासांतल्या आकडेवारीनुसार राज्यातली एकूण रुग्णांची संख्या २२ लाख ६६ हजार ३७४ वर पोहोचली आहे. त्यात १ लाख ६ हजार ७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट अजूनही ९२.९४ टक्के आहे, ही दिलासादायक बाब आहे. पण, त्याचवेळी रोज नव्या रुग्णांची संख्या वाढते आहे, ही काळजीची गोष्ट आहे. गुरुवारी दिवसभरात राज्यात एकूण ७,१९३ रुग्ण बरे झालेत.

मुंबई
आज दिवसभरात मुंबईत १,५०९ नवे रुग्ण आढळलेत. रुग्णांचा एकूण आकडा ३ लाख ३८ हजार ६४३ च्या घरात गेला आहे. दिवसभरात झालेल्या रुग्णांच्या ४ मृत्यूंमुळे मृतांचा आकडा वाढून ११, ५१९ वर गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER