कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहरु सायन्स सेंटरमध्येही कोरोना आरोग्य केंद्र ; आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

Aaditya Thackeray - Covid Center - Maharastra Today
Aaditya Thackeray - Covid Center - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर वरळीतील नेहरु विज्ञान केंद्रात कोव्हिड आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. नेहरु सायन्स सेंटरमध्ये 150 रुग्णशय्या क्षमतेच्या समर्पित कोरोना आरोग्य केंद्रासह पोद्दार आयुर्वेदिक महाविज्ञालयात 225 बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड काळजी केंद्र आहे. पर्यावरण मंत्री आणिमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते काल ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.

वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमता देखील 500 वरुन वाढवून आता 800 इतकी करण्यात येत आहे. ही कार्यवाही येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे नेहरु विज्ञान केंद्र, पोद्दार महाविद्यालय आणि एनएससीआय मिळून एकूण 1175 बेड्स उपलब्ध होतील.

कोव्हिड बाधितांवरील उपचारांसाठी यामुळे मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णशय्यांमधील एकूण 70 टक्के रुग्णशय्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button