राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, आज ५६ हजार २८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित (Corona) आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल ५६ हजार २८६ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ३७६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५७ हजार २८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, आज रोजी राज्यात एकूण ५,२१,३१७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज ३६ हजार १३० रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २६,४९,७५७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.०५ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१३,८५,५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,२९,५४७ (१५.१० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,०२,६१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,६६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button