दिवसभरात कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

मुंब्य्रातील खाजगी रुग्णालयातील सहा जणांना विलगीकरण कक्षात हलवले

There is no new corona patient in Ratnagiri district

ठाणे : ठाण्यात मंगळवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही २५ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात मुंब्रा भागात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यातील एक रुग्ण मुंब्य्रातील एका खाजगी रुग्णालयात कामाला होता. त्या अनुषंगाने महापालिकेने बुधवारी येथील सहा जणांना घोडबंदर भागातील भाइंदर पाडा येथील विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवले आहे. तर दिवसभरात ठाण्यात नव्या रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती पालिकेने दिली.

मंगळवारी मुंब्य्रातील अमृतनगर भागात आधीच्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तर सांयकाळपर्यंत त्यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. हा रुग्ण येथीलच एका खाजगी रुग्णालयात कामाला होता. त्यामुळे खबदारीचे उपाय म्हणून पालिकेने आता या रुग्णालयातील सहा जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध आता सुरू झाला आहे. तसेच शहराच्या इतर भागात खबदारीचे उपायही केले जात होते. आता शहरातील रुग्णांची संख्या ही २५ झाली असून दिवसभरात नवा रुग्ण आढळला नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.