
औरंगाबाद : राज ठाकरे यांनी मास्क न लावल्यामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला, असा आरोप करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार अॅड. रत्नाकर चौरे यांनी केली आहे.
मराठी भाषादिनानिमित्ताने राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी मास्क लावणे टाळले. राज हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माजी महापौराला मास्क लावण्यावरून प्रतिक्रिया दिली होती. यांचे मास्क प्रकरण बरेच चर्चेत आहे. मी मास्क घालणार नाही, असे राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.
राज ठाकरे ५ मार्चला नाशिकच्या दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात गर्दी केली. राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले. अशोक मुर्तडक यांनी दोन मास्क लावले होते. त्यांना दोन मास्क पाहिले आणि ‘मास्कवर मास्क’ असे विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला काढून ठेवला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला